लोकसभा निवडणूक २०१९: रावेर लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

२३ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Apr 3, 2019, 07:36 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९: रावेर लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम  title=

रावेर : रावेर मतदारसंघातून भाजपने उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेले एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने नितीन कांडेलकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. रावेर मतदारसंघात खडसेंची मजबूत पकड आहे. रावेरमध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे.

२०१४ चा निकाल

२०१४ लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे  विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांचा जवळपास ३ लाख मतांनी पराभव केला.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

 पक्ष

 मतदान

रक्षा खडसे भाजप 605452
मनिषदादा जैन राष्ट्रवादी 287384
दशरथ भांडे कम्युनिस्ट पक्ष 29752
उल्हास पाटील बसपा 21332