मुंबई : अमरावती (Amravati Disctrict) शहरासह अचलपुरात पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात ६० टक्के भागात कोरोना पसरल्याची महापालिका आयुक्तांनी माहिती दिली आहे. अमरावती आणि अचलपूर शहरात पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. आज सायंकाळी ७ वाजल्यापासून एक आठवडा कडकडीत बंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निर्णय घेतला आहे.
अमरावती आणि अचलपूर शहरात पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. आज सायंकाळी ७ वाजल्यापासून एक आठवडा अमरावती जिल्ह्यात कडकडीत बंद असणार आहे. कोरोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा निर्णय घेतला. अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत होती. सोबतच कोरोना संकटातही नागरिकांचा बेजबाबदारपणाही दिसून येत होता. त्यामुळे अखेर एक आठवडा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करीत होते.
संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे जिथे आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यभर ‘मी जबाबदार’ मोहीम राबविण्यात येत आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखलेसुद्धा. पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे, आपण सर्व बाहेर आलो आहोत त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही आपली व्यक्तिगत जबाबदारी आहे.