काकांकडून पुतण्याचा 'टप्प्यात कार्यक्रम'? संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडेच? अजित पवार विरुद्ध...

Big Fight In Baramati For Maharashtra Assembly Election 2024: बारामतीमध्ये लोकसभेला तगडा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आता विधानसभेला येथील निवडणूक अधिक रंजक होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 21, 2024, 10:21 AM IST
काकांकडून पुतण्याचा 'टप्प्यात कार्यक्रम'? संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडेच? अजित पवार विरुद्ध... title=
शरद पवारांच्या पक्षाच्या संभाव्य उमेदवाराचं नाव समोर

Big Fight In Baramati For Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीला बारामती मतदारसंघामध्ये कडवी झुंज पहायला मिळाली. बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या पक्षाच्या विद्यमान खासदार आणि कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली होती. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असल्याने या मतदारसंघातील पवार विरुद्ध पवार संघर्षात कोण बाजी मारणार याबद्दल कमालीची उत्सुकता होती. मात्र निकालाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीची जेवढी चर्चा झाली त्याहून अधिक चर्चा आता या मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीची असेल असं सांगितलं जात आहे. त्याला कारणही तसेच खास आहे. कारण आता शरद पवार विरुद्ध अजित पवार या एका पिढीतील काका पुतण्या वादाचं दुसरं पर्वही काका-पुतण्या असेच होणार असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. म्हणजेच यंदाच्या विधानसभेला बारामतीमध्ये काका-विरुद्ध पुतण्या आधी थेट लढत होणार आहे. शरद पवार हे अजित पवारांच्या पुतण्यालाच त्यांच्याविरुद्ध उभं करणार असल्याचं संभाव्य यादीमधून स्पष्ट होत आहे.

अजित पवार बारामतीतूनच लढणार

अजित पवार यांनी पूर्वी बारामतीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं. मात्र आता अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अजित पवार सातव्यांदा या मतदारसंघातून विधानसभा लढणार आहेत. येत्या सोमवारी 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या मुहूर्तावर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्तेही आग्रह असल्याने त्यांनी इथूनच लढण्याचं ठरवल्याचं सांगितलं जात आहे. 

नक्की वाचा >> पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही...'

अजित पवारांविरुद्ध शरद पवारांकडून तगडा उमेदवार

शरद पवारांकडून बारामतीमध्ये पवार कुटुंबातील पुढच्या पिढीला म्हणजेच युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. नव्या चेहऱ्याला आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्यासंर्भात यापूर्वी शरद पवारांच्या पक्षाबरोबरच कार्यकर्त्यांकडून अनेकदा मागणी झाल्याचं पाहायला मिळालं. युगेंद्र पवार यांच्याकडे भावी नेतृत्व म्हणून पाहिलं जात असतानाच शरद पवार त्यांना थेट काका अजित पवारांविरुद्ध रिंगणात उतरवू शकतात असं सांगितलं जात आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या उमेदवारांची संभाव्य यादी : बीड, अकोला, आंबेगाव, घाटकोपरसहीत 39 मतदारसंघातील उमेदवार कोण पाहाच

कोण आहेत पुढच्या पिढीतील हे पवार?

युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. अजित पवारांचे सख्खे धाकटे भाऊ श्रीनिवास यांचे ते पुत्र आहेत. युगेंद्र पवार यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं असून ते शरयू अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिवाय बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहेत. याचप्रमाणे युगेंद्र पवार यांच्याकडे विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदही आहे.

नक्की वाचा >> मुंबईत कहानी में ट्विस्ट... BJP ने तिकीट न दिल्याने 'हा' बडा नेता थेट ठाकरेंच्या सेनेत? निवडणूक लढणारच

अजित पवारांचा मुलगा आणि पत्नी पराभूत

यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये पार्थ पवार मावळ मतादरसंघातून पराभूत झाले होते. श्रीरंग बारणे यांनी पराभूत केलं होतं. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा त्यांच्याच नणंद सुप्रिया सुळेंनी पराभव केला होता.

नक्की वाचा >> Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?

त्यामुळे आता अजित पवारांच काय होणार हे नोव्हेंबरच्या 23 तारखेलाच स्पष्ट होईल.