Shivsena Candidate Second List: शिवसेनेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. कुडाळमधून निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरळमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 22 ऑक्टोबर रोजी शिवसेनेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते. यानंतर भाजपचे आणखी 2 नेते धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्वमधून तर बाळापूरमधून बळीराम शिरसरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभ भाजपकडून लढण्यासाठी मुरजी पटेल यांनी तयारी केली होती. पण हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याने मुरजी पटेल यांना शिवसेनेकडून तिकीट जाहीर झाले आहे.
जय महाराष्ट्र
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत… pic.twitter.com/1tEjTEb97w
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) October 27, 2024
1)अक्कलकुवा - आमश्या पाडवी
2)बाळापूर- बळीराम शिरसकर
3)रिसोड - भावना गवळी
4)हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
5)नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
6) परभणी - आनंद शेशराव भरोसे
7) पालघर - राजेंद्र घेड्या गावित
8) बोईसर (अज) - विलास सुकुर तरे
9)भिवंडी ग्रामिण (अज) - शांताराम तुकाराम मोरे
10) भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी
11)कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर
12)अंबरनाथ (अजा) - डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
13) विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे
14) दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
15) अंधेरी पूर्व - मुरजी कांनजी पटेल
16) चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते
17) वरळी - मिलींद मुरली देवरा
18) पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे
19) कुडाळ - निलेश नारायण राणे
20) कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षिरसागर