उद्धव ठाकरे अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'चर्चा...'

Sanjay Raut on Aditya Thackeray: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) सध्या महायुतीमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असताना ते मात्र तयार नाहीत आणि दुसरीकडे अमित ठाकरेही (Amit Thackeray) निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 29, 2024, 11:52 AM IST
उद्धव ठाकरे अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'चर्चा...' title=

Sanjay Raut on Aditya Thackeray: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) सध्या महायुतीमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असताना ते मात्र त्यासाठी तयार नाहीत. याउलट सदा सरवणकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे अमित ठाकरेही (Amit Thackeray) निवडणूक लढण्यावर ठाम असून त्यांनी सोमवारी अर्जही दाखल केला आहे. दरम्यान कुटुंबातील सदस्य असल्याने अमित ठाकरेंना उद्धव ठाकरे पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यातच संजय राऊ यांनी यावर भाष्य केलं आहे. 

अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, "हा त्या दोन पक्षांचा प्रश्न आहे. मनसे आणि सदा सरवणकरांचा पक्ष हे एकाच आघाडीतील पक्ष आहेत. आम्ही वेगळे लढत आहोत असं ते दाखवत आहेतत. त्या दोन पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्या पक्षात चर्चा होईल तेव्हा त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल". 

पुढे ते म्हणाले की, "दादर-माहीम मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा जॉर्ड फर्नांडिस निवडणूक लढवत नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार लढत असतात. अनेक नेत्यांची मुंलं निवडणूक लढत आहेत. राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला निवडणूक लढावी लागते. मग माझे वडील, आई, आजोबा कोण आहेत याचा विचार न करत निवडणूक लढायची असते. तुम्ही याचा फार बाऊ करु नका. हे राज्य फार मोठं आहे, आमच्या पक्षातील निर्णय उद्धव ठाकरे घेतील".

श्रीनिवास वनगा यांच्या नाराजीवर ते म्हणाले की, "हे आमदार एकनाथ शिंदेमुळे नाही तर उद्धव ठाकरेंमुळे झाले. पण हे महायश सूरत, गुवाहाटी, गोव्याला गेले. आम्ही टेबलावर त्यांना नाचताना पाहिलं. तेव्हा त्या भागातील अनके शिवसैनिकांना रडू कोसळलं होतं. याला आम्ही निवडून दिलं आणि आज अशा प्रकारे तांडव करत आहे. आता ही कर्माची फळं असतात, आणि ती अनेकांना भोगावी लागतात. एकनाथ शिंदेंनहाी ही कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेंनाही रडू कोसळेल". त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत का? असं विचारलं असता या प्रश्नाला अर्थ नाही. पश्चाताप झाला असेल तर घरी बसा असं ते म्हणाले. 

"शेतकरी कामगार पक्ष आमचा मित्रपक्ष आहे. यासाठी आमच्या शिवसेनेच्या कोट्यातील रायगडमधील किमान दोन जागा सोडण्यास आम्ही तयार आहोत. काँग्रेस आणि आमच्यात काही टोकाचे मतभेद नाहीत. आघाडीत किंवा कोणत्याही युतीत एखाद्या जागेवरुन शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा सुरु असते. म्हणजे त्यावरुन बिनसलं असं नाही. नाना गावंडे यांच्याशी चर्चा झाली. दक्षिण सोलापूरचा विषय मिटवला आहे असं त्यांनी सांगतलं. इतर ठिकाणीही आम्ही समन्वयाने भूमिका घेणार आहोत," असं संजय राऊतांनी सांगितलं.