Maharashtra Assembly Elections 2024 : निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला आहे. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरेल जात आहेत. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. वेळेत अर्ज भरता यावासाठी इच्छुकांची धावपळ पहायला मिळाली. नाशिकमध्ये शिंदे गटाने हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत. हेलिकॉप्टरने पाठवण्यात आलेल्या या एबी फॉर्मची राजकीस वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट सामना होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमणात बंडखोरी झाल्याचे दिसत आहे. बंडोबांचा थंडोबा करण्याचं प्रस्थापितांसमोर आव्हान आहे. अशातच नाशिकमध्ये शिंदे गटाने हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत.
नाशिक देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी पहायला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेने अचानक उमेदवार दिले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून देवळाली मद्ये राजश्री आहिराव यांना उमेदवारी दिली आहे. तर, दिंडोरीत झिरवाळ यांच्या विरोधात धनराज महाले यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या खेळीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची कोंडी पहायसा मिळत आहे. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सरोज अहिरे उमेदवार आहेत. तर दिंडोरी मधून झिरवाळ अजित दादांचे उमेदवार आहेत.
29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल.. तर 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल.. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडेल तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा महानिकाल लागेल.