महाराष्ट्र हादरला! शिक्षकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यावर...

शिक्षकानेच दहावीच्या विद्यार्थीनवर बलात्कार केला आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 12, 2025, 03:31 PM IST
महाराष्ट्र हादरला! शिक्षकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यावर... title=

Nanded Crime News : शिक्षक हे नवी पिढी निर्माण करतात. मात्र, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. एका शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार केला आहे. शिक्षकाच्या अत्याचारानंतर ही अल्पवीयन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिक्षकाच्या या कृत्याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील ही घटना आहे. या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद करण्यात आला.  इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजवून शिक्षकानेच वारंवार लैंगिक आत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. यानंतर या अल्पवयीन विद्यार्थीनीचा गर्भपात देखील करण्यात आला. 

ही घटनानंतर मुलीच्या कुटुंबीयांना कळाली. मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पाळण्यात आला. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. 

लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीची धिंड

नागपूर पोलिसांनी कुख्यात गुंड रोशन शेखची धिंड काढलीये. ब्लॅकमेल करीत तसेच लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करत रोशनची धिंड काढली. खंडणी मागितल्या प्रकरणी तो कारागृहात होता. सहा महिन्यांपूर्वी रोशनने लग्नाचं आमिष देत एका तरुणीशी शारीरिक सबंध ठेवलं. रोशनचे अन्य मुलीशी सबंध असल्याच समजताच पिडीतीने लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे पीडित तरुणीला रोशनने मारहाण केली. एवढ्यावर न थांबता रोशने तिची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल केली. या विरोधात पीडितेने सदर पोलिसात तक्रार दिली.तक्रारीनंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगार असलेल्या रोशन शेखला अटक करुन धिंड काढली.