'योग्य लोक तुम्हाला...,' ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड निक्की शर्मांची Insta पोस्ट, 'काही लोकांना...'

India's Got Latent Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचा धनी झालेला असताना त्याच्या ब्रेकअपच्य़ा चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यातच आता निक्की शर्माने एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे.    

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2025, 02:32 PM IST
'योग्य लोक तुम्हाला...,' ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड निक्की शर्मांची Insta पोस्ट, 'काही लोकांना...' title=

India's Got Latent Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट' शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान त्याची कथित गर्लफ्रेंड निक्की शर्मासह ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकाला अनफॉलो केलं आहे.  Bollywood Shaadis ने दिलेल्या रिपोर्टनुसार, रणवीरने निक्कीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं आणि तीही आता त्याच्या दोन्ही प्रोफाइलपैकी एकाही प्रोफाइलला फॉलो करत नव्हती. यामुळे दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतल्याचा अंदाज लावला जात आहे. त्यांनी एकमेकांना अनफॉलो करतानाचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.

या अफवांना आणखी बळकटी देत निक्कीने अलीकडेच शरीर नकारात्मक उर्जेला नकार देत असल्याबद्दल एक गूढ पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने लिहिलं होतं की, "तुमचे शरीर फक्त अन्न नाकारत नाही; ते उर्जेला देखील नाकारते. जर तुमचे शरीर काही ठिकाणे, लोक किंवा गोष्टी नाकारू लागले तर त्यावर विश्वास ठेवा आणि ऐका." 

इंडियाज गॉट लेटंटमध्ये केलेल्या टिप्पण्यांमुळे रणवीरवर टीका आणि तक्रारी दाखल झाल्यानंतर निक्कीने ही पोस्ट शेअर केली होती. अलीकडच्या घडामोडींनुसार, हे दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत असल्याचं दिसत आहे. इंस्टाग्रामला एक स्टोरी तिने शेअर केली असून त्यात म्हटलं आहे की, 'योग्य लोक तुम्हाला ऐकतोय, प्रेम करतोय, किंमती आहात असं जाणवू देतात'.

रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला गोव्यात धक्कादायक अनुभव आला होता, ज्यामध्ये त्यांनी जवळपास मृत्यूला स्पर्श केला होता. दोघेही गोव्यात सुट्टीवर होते.  यावेळी जे जवळजवळ बुडाले होते. रणवीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आता योग्य असल्याचं सांगितलं होतं. 

नेमका वाद कशावरुन?

इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, "तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना दररोज सेक्स करताना पाहाल की एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवाल?". हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी अलाहबादियावर टीका केली. त्याच्याविरुद्ध अनेक पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्याचे इंस्टाग्रामवर 4.5 दशलक्ष फॉलोअर्स आणि 1.5 कोटी युट्यूब सबस्क्रायबर्स आहेत.

रणवीरने मागितली माफी

31 वर्षीय रणवीर अलाहबादियाने एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने कॅप्शन दिली आहे की, "इंडियाज गॉट लॅटंटमध्ये मी जे काही म्हणलं तो बोलायला नको होतं. मी माफी मागतो". व्हिडीओमध्ये रणवीर अलाहबादिया सांगत आहे की, "माझी टिप्पणी अजिबात योग्य नव्हती. ती मजेशीरही नव्हती. विनोद हा माझा पिंड नाही, मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे".

रणवीर अलाहबादियावर टीका करताना अनेकांनी त्याला अशाप्रकारे या प्लॅटफॉर्मचा वापर करणं योग्य आहे का? अशी विचारणा केली आहे. त्यावर भाष्य करताना तो म्हणाला की, "अर्थातच मी या प्लॅटफॉर्मचा वापर अशा प्रकारे करू इच्छित नाही. जे काही घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ, औचित्य किंवा तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. वैयक्तिकरित्या माझा निर्णय घेण्यात चूक झाली. माझ्याकडून ते कूल नव्हतं". 

"हा पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात, मी अशी व्यक्ती बनू इच्छित नाही जी ती जबाबदारी गांभीर्याने घेणार नाही. मी कधीही कुटुंबाचा अनादर करणार नाही," अशीही बाजू त्याने मांडली आहे.