पृथ्वीखाली काहीतरी हलत आहे? दिवसाच्या 24 तासातील काही तास कमी होणार? जाणून घ्या शास्त्रज्ञांचा अभ्यास

Earths Inner Core: शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा अतिशय आश्चर्यकारक आहे. या बदलाचा परिणाम केवळ पृथ्वीच्या आतील भागावर होणार नाही तर पृथ्वीच्या परिभ्रमण, दिवसाची लांबी आणि चुंबकीय क्षेत्रावरही परिणाम होऊ शकतो  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 12, 2025, 01:14 PM IST
पृथ्वीखाली काहीतरी हलत आहे? दिवसाच्या 24 तासातील काही तास कमी होणार? जाणून घ्या शास्त्रज्ञांचा अभ्यास  title=

Seismic Wave Study: पृथ्वीच्या गर्भात असे काही घडत आहे ज्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. गर्भात नक्की काय होतंय हे आजपर्यंत वैज्ञानिक पूर्णपणे समजू शकले नाहीत. अलीकडेच पृथ्वीच्या आतील गाभ्याचा आकार बदलत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. हा धक्कादायक शोध आपल्या 24-तासांच्या दिवसावर तसेच पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि इतर भूगर्भीय प्रक्रियांवर परिणाम करू शकतो. असे मानले जात आहे की, पृथ्वीचा आतील गाभा घन आणि स्थिर आहे, परंतु नवीन अभ्यासांनी या कल्पनेला आव्हान दिले आहे. पृथ्वीखाली काहीतरी हलत असल्याचे समोर येत आहे. 

भूकंपाच्या लहरींनी केला खुलासा 

नेचर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, पृथ्वीखाली काहीतरी हलत असल्याचा या शोधाचा आधार भूकंप लहरींचे विश्लेषण आहे. शास्त्रज्ञांनी अलास्का आणि कॅनडात बसवलेल्या भूकंपमापकांच्या सहाय्याने दक्षिण अटलांटिक महासागरात स्थित दक्षिण सँडविच बेटांवर झालेल्या भूकंपाच्या लहरी रेकॉर्ड केल्या. 2004 ते 2008 दरम्यान नोंदवलेल्या डेटावरून असे दिसून आले की काही लहरींच्या वेव्हफॉर्ममध्ये बदल झाला आहे. याचे कारण असे की या लहरी पृथ्वीच्या आतील गाभ्यामधून गेल्या होत्या, ज्याचा आकाराने बदलत आहेत.

हे ही वाचा: बॉडी वॉश ते गीझर, मुंबईच्या रस्त्यावर महिलांसाठी धावतेय अनोखी बस; पंचतारांकित हॉटेलपेक्षा नाही कमी

 

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आणि दिवसाच्या लांबीवर होणार परिणाम

पृथ्वीच्या आतमध्ये होत असलेले बदल समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आतील गाभा कालांतराने हळूहळू वाढत जातो कारण बाहेरील गाभातील लोखंडी कण स्फटिक होऊन त्यावर स्थिरावतात. ही प्रक्रिया बाह्य गाभ्यामध्ये गतिशीलता राखते, ज्यामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सक्रिय राहते. याशिवाय, आतील गाभ्याच्या फिरण्याच्या गतीतील बदलाचा परिणाम पृथ्वीच्या परिभ्रमणावरही होतो, त्यामुळे दिवसाची लांबी थोडी जास्त किंवा कमी होऊ शकते.

हे ही वाचा: वय तीन वर्षे, उंची साडेसहा फूट, नाव किंग काँग... थायलंडची म्हैस होतेय व्हायरल; कारण...

 

अजून संशोधनाची गरज 

या संशोधनामुळे पृथ्वीच्या आतील गाभ्याबद्दलची माहिती समजली. परंतु अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. हा बदल भविष्यात दिवसाच्या लांबीवर लक्षणीय परिणाम करू शकतो का?  याचा शास्त्रज्ञ आता सखोल तपास करत आहेत.अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन विडेल यांच्या म्हणण्यानुसार, आता प्रथमच आतील गाभा विकृत होत असल्याचे दिसून येत आहे.यावर अधिक खोलवर अभ्यास झाल्यास पृथ्वीवरील रहस्ये उलगडता येतील.