Free shower facility for Mumbai women: शाम्पू, गीझर, अंघोळीची परिपूर्ण सुविधा, तेही चालत्या बसच्या आत. ऐकून आश्चर्यचकित झालात ना. विशेष म्हणजे ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. होय मुंबईच्या रस्त्यावर एक अनोखी बस धावतेय. या विशेष बसचा महिनाभरात मोठ्या संख्येने महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. ही बस आहे एक मोबाईल बाथरूम आहे. या मोबाईल बाथरूमचे (Bathroom bus) व्यवस्थापन बी द चेंज नावाची संस्था करत आहे. तीन बहिणी मिळून महिलांना अंघोळीची ही सुविधा देणारी बस चालवतात. यातून त्या महिलांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे काम करत आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी सहकार्य केले आहे. महिलांना मोफत शॉवर सेवा खूप आवडत असल्याचा फीडबॅक आहे.
या अत्याधुनिक मोबाईल बाथरूमध्ये पाच मोबाईल फोन चार्जर आणि दोन कपडे सुकवण्याचे ड्रायर आहेत. हँडवॉश, बॉडीवॉश, शाम्पू, टब आणि गीझर या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत.
हे ही वाचा: धक्कादायक! एका दिवसात दोन देशांमध्ये खेळला सामना, कोण आहे हा खेळाडू?
मोबाईल बाथरूमचा हा प्रकल्पांतर्गत मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या महिलांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. शॉवर सेवा देण्यासाठी बसचे हायटेक मोबाईल बाथरूममध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
पाण्याची बचत करण्यासाठी आणि या सुविधेसाठी लांब रांगांपासून लोकांना वाचवण्यासाठी या बसमध्ये अवघ्या 10 मिनिटांत सर्व पाणी बाहेर काढण्याची सुविधा आहे. म्हणजेच पाणी वाचवण्यासाठी त्यात एक खास यंत्रणा बसवण्यात आली आहे, ज्यामुळे अवघ्या 10 मिनिटांत संपूर्ण बसचे पाणी वाहून जाते. ही बस केवळ स्वच्छता आणि सोयीचे प्रतीक बनली नाही तर दोन महिलांसाठी रोजगाराचे साधनही बनली आहे.
हे ही वाचा: वय तीन वर्षे, उंची साडेसहा फूट, नाव किंग काँग... थायलंडची म्हैस होतेय व्हायरल; कारण...
या फिरत्या बाथरूम सुविधेची संकल्पना महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली आणि जिल्हा नियोजन समिती आणि महानगरपालिकेने राबवली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता शहरातील इतर भागातही अशा हाय-टेक फ्री मोबाईल बाथिंग रूम्स आणण्याची तयारी सुरू आहे आणि बीएमसीने आपल्या बजेटमध्येही याचा उल्लेख केला आहे.