सैराट सिनेमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. याला कारण ठरलाच रिंकूचा एक फोटो. रिंकू राजगुरुने यावेळी कोणत्या अभिनेत्यासोबत नाही तर भाजप नेते धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक याने शेअर केलेल्या फोटोत दिसली आहे. या फोटोनंतर ती चर्चेतच राहिली आहे.
स्टोरीत काय दडलंय?
रिंकू राजगुरुने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. रिंकूने कृष्णराजसोबत शेअर केलेल्या वेळेचाच आपला एकटीचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती गोल्डन अशा पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच तिच्या कपाळावर अर्धचंद्र टिकली असून त्या खाली कुंकू दिसत आहे. या फोटोत रिंकूची नजर खाली झुकलेली आहे. या फोटोनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
या पोस्टमध्ये वेगळं काय?
रिंकूने शेअर केलेल्या या फोटोमधील तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसत आहे. तसेच या फोटोला तिने 'अपने रंग मे मुझको रंग दे' या गाण्याचं म्युझिक जोडलं आहे. त्यामुळे चाहते वेगळाच अर्थ काढत आहे.
आधीचा फोटोही चर्चेत
10 फेब्रवारी रोजी कृष्णराज महाडिक याने अभिनेत्रीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली होती. गेल्या काही दिवसांपासून कृष्णराज आपल्या युट्यूब अकाऊंटवरुन लग्नाचा विचार करत असल्याची चर्चा आणि त्याचा एक व्हिडीओ केला होता. यानंतर हा फोटो आल्यामुळे रिंकू आणि कृष्णराज यांचं लग्न होणार आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
फोटो खाली कमेंट्सचा पाऊस
रिंकू आणि कृष्णराजने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. आर्चीला परश्या भेटला? यंदा कर्तव्य आहे या ना अशा अनेक कमेंट आहेत. पण या सगळ्यावक कृष्णराज किंवा रिंकू या दोघांनीही कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती सत्य आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे.