Dasun Shanaka Controversy: क्रिकेट जगतात काहीही होऊ शकते हे आपल्याला माहीतच आहे. पण अलीकडेच एक विचित्र घटना घडली आहे. एका खेळाडूने एकाच दिवशी दोन देशांमध्ये दोन सामने खेळले आहेत. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून श्रीलंकेचा माजी कर्णधार दासुन शनाका आहे. आता दासुन शनाका मोठ्या वादात सापडला आहे. शनाका एकाच दिवशी दोन देशांमध्ये दोन सामने खेळताना आढळून आला आहे. तो एका देशात स्वतःचा खेळ खेळल्या नंतर दुखावण्याच्या बहाण्याने पहिला सामना सोडून विमानाने दुसऱ्या देशात गेला. तिथे तो दुसरा सामना खेळला. आता याच कारणांमुळे तो वादात सापडला आहे. यामुळे त्याला श्रीलंका क्रिकेटच्या (SLC) चौकशीलाही सामोरे जावे लागेल.
मिळलेल्या माहितीनुसार असे समोर आले आहे की, शनाकाने UAE मध्ये आंतरराष्ट्रीय लीग T20 संघ दुबई कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी प्रथम श्रेणीचा सामना अपूर्ण सोडला होता. एसएलसीचे सीईओ ऍशले डी सिल्वा यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की शनाकाचा क्लब सिंहली स्पोर्ट्स क्लब देखील याची तपासणी करत आहे. यादरम्यान, मॅच रेफरीला असा विश्वास देण्यात आला की शनाका खेळादरम्यान जखमी झाला आहे. यामुळे तो संघापासून वेगळा झाला आहे.
श्रीलंकेच्या देशांतर्गत सामन्यात सिंहली स्पोर्ट्स क्लबसाठी सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शनाकाने 87 चेंडूत 123 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी संपूर्ण सामना संपण्यापूर्वीच तो निघून गेला. तो त्याची पारी खेळून पटकन फ्लाईट पकडून विमानाने यूएईला गेला. जेव्हा मूर स्पोर्ट्स क्लबची फलंदाजी सुरू होत असतानाच दासुन शनाका गोलंदाजीसाठी आला नाही, परंतु काही तासांनंतर त्याच दिवशी दुबई कॅपिटल्ससाठी त्याने केवळ 12 चेंडूत 34 धावा केल्या.
हे ही वाचा: वय तीन वर्षे, उंची साडेसहा फूट, नाव किंग काँग... थायलंडची म्हैस होतेय व्हायरल; कारण...
शनाका 2024 मध्ये श्रीलंकेकडून शेवटचा खेळला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकला नाही. दुबई कॅपिटल्स संघ चॅम्पियन बनला आहे. एसएससी सामना सोडल्यानंतर शनाकाने आंतरराष्ट्रीय T-२० लीगमध्ये तीन सामने खेळले. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने आशिया कप जिंकला आहे. शनाकाने श्रीलंकेसाठी सहा कसोटी सामने, 71 वनडे आणि 102 T-20 सामने खेळले आहेत.