35 वर्षे जुना चित्रपट, 1 कोटी बजेट अन् 45 कोटींची कमाई, आजही YouTube वर पाहू शकता

1 कोटी बजेट अन् 45 कोटींची कमाई. 35 वर्षे जुन्या या चित्रपटाने मोडले होते अनेक विक्रम. आजही चित्रपटाचे नाव ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 12, 2025, 03:41 PM IST
35 वर्षे जुना चित्रपट, 1 कोटी बजेट अन् 45 कोटींची कमाई, आजही YouTube वर पाहू शकता title=

Bollywood Biggest Blockbuster Movie: हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली करून प्रेक्षकांमध्येही आपली छाप सोडली. विशेष म्हणजे हे चित्रपट कालांतराने अधिक पसंत केले जाऊ लागले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका 35 वर्षे जुन्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. ज्याने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई करत अनेक विक्रम मोडले होते.

हा चित्रपट 35 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि आजही त्याचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. आजही हा चित्रपट हृदयाच्या खूप जवळ आहे. या चित्रपटामध्ये सुंदर रोमँटिक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. जी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकता.

सलमान खानचा 'मैंने प्यार किया' 

 'मैंने प्यार किया' चित्रपटाची कथा आणि  त्यामधील पात्रे अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत. चित्रपटाची कथा, पात्रे आणि गाणी खूपच हिट झाली होती. या चित्रपटाने लोकांची मने जिंकली होती. हा चित्रपट सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्री दिसले होते. हा त्या दोघांचाही मुख्य पदार्पण चित्रपट होता. सलमान आणि भाग्यश्री यांच्यासह या चित्रपटात आलोक नाथ, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, राजीव वर्मा, अजित वच्छानी आणि हरीश पटेल यांच्यासारखे उत्तम कलाकार होते. 

या चित्रपटाची कथा सलमान आणि भाग्यश्रीच्या प्रेमकथेभोवती फिरते. या चित्रपटातील 'दिल दीवाना', 'कबूतर जा जा', 'आया मौसम दोस्ती का' आणि 'मेरे रंग में रंगने वाली' या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. ही गाणी एस. पी. बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायली आणि राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केली आहेत.

चित्रपटाचे बजेट आणि कमाई

 'मैंने प्यार किया' हा चित्रपट त्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. मिडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट फक्त 1 कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर 45 कोटी रुपयांची कमाई केली होती. जर तुम्हाला ते पहायचे असेल तर तुम्ही ते Zee5 आणि Amazon Prime Video वर पाहू शकता. तथापि, जर तुम्हाला ते मोफत पहायचे असेल तर तुम्ही ते MX Player किंवा YouTube वर पाहू शकता.