सावधान...कोरोनामुळे रुग्णाचा सकाळी मृत्यू, दुपारी अकाऊंटमधून पैसे गायब... फिंगर प्रिंटचा गैरवापर?

कोरोनाची परिस्थिची पाहाता काही लोक आपल्या जीवाची परवा न करता माणुसकी दाखव आहेत, तर कुठे लोकं याच माणुसकीला काळीमा लावण्याचं काम करतात. 

Updated: Apr 27, 2021, 03:45 PM IST
सावधान...कोरोनामुळे रुग्णाचा सकाळी मृत्यू, दुपारी अकाऊंटमधून पैसे गायब... फिंगर प्रिंटचा गैरवापर? title=

जालना : कोरोनाची परिस्थिची पाहाता काही लोक आपल्या जीवाची परवा न करता माणुसकी दाखव आहेत, तर कुठे लोकं याच माणुसकीला काळीमा लावण्याचं काम करतात. काही लोकं इतकी निर्दयी आहेत की, जे मेलेल्यांना देखील सोडत नाहीत. महाराष्ट्रातील जालना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालनाच्या एका वॉर्ड बॉयने जे काम केले आहे, ते ऐकून तुम्ही विचार कराल एखादी व्यक्ती इतक्या खालच्या थराला कशी काय जाऊ शकते? एखादी व्यक्ती जर वाईट प्रसंगात अडकली असेल तर त्याला मदत करणे तर सोडाच, परंतु असं कुकर्म करत असेल तर, त्याला माणूस तरी म्हणावा का? हाच मोठा प्रश्न आहे.

ही घटना जालनाच्या शासकीय कोविड रुग्णालयातील आहे. येथे एका वॉर्ड बॉयने कोरोना रुग्णाच्या मृत्युनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटचा वापर केला आणि ‘Phone Pay’ या ऍपद्वारे बँक खात्यातून पैसे स्वत: च्या खात्यात जमा केले. पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करून आरोपी वॉर्ड बॉयला पकडले आहे. या आरोपीने यापूर्वी असा गुन्हा केलेला नाही असे सध्या तरी समोर आले आहे. याचा संपूर्ण तपास पोलिस सध्या करत आहेत.

उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू

जालना शहरातील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या कचरू पिंपराळे असे या मृत व्यक्तिचे नाव आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी कोरोना टेस्ट झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला, यानंतर त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पिंपराळे यांच्या निधनानंतर त्यांच्या खात्यातून काही पैसे काढले गेले असे त्यांच्या नातेवाईकांच्या नजरेत आले. बँक स्टेटमेन्ट आणि मोबाईल डीटेल्स तपासले गेले तेव्हा कचरू पिंपराळे यांचा फोन वापरुन त्यांच्या फिंगरप्रिंट मार्फत 6 हजार 800 रूपये काढण्यात आले हे समोर आले आहे.

सकाळी मृत्यू आणि दुपारी पैसे ट्रांसफर

पहाटे 6 वाजता कचरू पिंपराळे यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या खात्यातील पैसे दुपारी दीड ते दोन या वेळेत ट्रांसफर झाले. हे कसे शक्य आहे? हा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांच्या मनात आला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, पिंपराले यांचा मोबाईल हॉस्पिटलमध्येच राहिला आहे.

अंगठी आणि पैसे चोरीचा आरोप

कचरू पिंपराळे यांच्या निधनानंतर कोविड हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयने फिंगरप्रिंट वापरुन खात्यातून 6 हजार 800 रूपये काढले आहेत.  नातेवाईकांना तो पुरावा सापडला. पण या व्यतिरिक्त पिंपराळे यांच्याकडे 34 हजार रुपये रोकड आणि चांदीची अंगठी होती, ते ही गायब असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहेत. त्या वॉर्ड बॉयने अंगठी आणि पैसे चोरल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात पोलिस सखोल चौकशी करत आहेत.