मुंबई : Maharashtra Cabinet expansion News : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जुलैला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपला 27 तर शिंदे गटाला 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. गृह, अर्थ अशी महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार, अशी सूत्रांची माहिती आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना भाजप जास्तीचे खाती घेणार आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळाल्याने शिंदे गटाला कमी महत्वाची मंत्रीपदे मिळणार आहेत. त्यामुळे कोणाला काय मंत्रीपद मिळते याची उत्सुकता आहे. गृह, अर्थ यांसारखी महत्त्वाची मंत्रालये भाजपकडे ठेवण्याची तयारी आहे.
भाजपला 27 तर शिंदे गटाला 16 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाला नगर विकास, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, कृषी आणि ग्रामीण विकास अशी खाती हवी आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये सध्या चढाओढ दिसून येत आहे. दोन्हीकडून नाराजी होऊ नये म्हणून मध्य काढण्यासाठी मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत असल्याची चर्चा सुरु आहे.