वर्धा : वर्ध्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्ध्याच्या आर्वीमध्ये 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात केल्याच प्रकरण उघड झालं आहे. कदम हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. 30 हजार रुपयांत कदम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे.
हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता पोलिसांच्या हाती आणखी धक्कादायक माहिती लागली आहे.
पोलिसांच्या तपासात हॉस्पीटलच्या गोबर गॅसच्या टाकीत 11 कवट्या आणि अर्भकाच्या हाडांचे 54 तुकडे सापडले आहेत. या प्रकरणात कदम हॉस्पिटलच्या डॉक्टर रेखा कदमसह अल्पवयीन मुलांसोबत त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.
परिसरात अजून काही अर्भक, मांसाचे गोळे, हाडाचा चुरा सापडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी हॉस्पिटलमधली सोनोग्राफी मशीन जप्त केलीय. अजून किती मुलींचे गर्भपात केलेत. याचा तपास पोलीस करतायत.
कसं उघड झालं प्रकरण
आर्वीत एक १३ वर्षीय मुली तिच्या शेजारी राहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलाने बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून ती मुलगी गर्भवती राहिली. मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या आई वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेलं असता मुलगी ही बाब उघडकीस आली.
ही गोष्ट समजल्यावर मुलाच्या आई वडिलांनी मुलीवर आणि तिच्या पालकांवर दबाव टाकत मुलीचा गर्भपात करण्यास सांगितलं. यासाठी त्यांनी कदम हॉस्पीटलच्या डॉ. रेखा कदम यांना पैसेही दिले. यानंतर रेखा कदम यांनी कदम हॉस्पीटलमध्ये सहा जानेवरीला मुलीचा गर्भपात केला. धक्कादायक म्हणजे गर्भपातानंतर हॉस्पीटलच्या मागेच असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत अर्भक टाकून देण्यात आलं.