Maharashtra Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारं वातावरण आणि अवकाळीचं सावट आता बऱ्याच अंशी कमी होताना दिसत आहे. परिणामी राज्याच्या बहुतांश भागांमधील किमान तापमानात आता घट होण्यास सुरुवात झाली असून, उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत असली तरीही बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हालचाली आणि त्यामुळं निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा राज्यावर काही परिणाम करतो का, याकडेही हवामान विभागाचं लक्ष आहे.
तिथं निफाडमध्ये तापमान 12 अंशावर आलेलं असतानाच नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही तापमानात मोठी घट झाली. कोकणातवर असणारं पावसाचं सावटही आता टळू लागलं असून, या भागातील कमाल तापमानातही घट नोंदवली जात आहे. बुधवारी ही या भागात तापमानात लक्षणीय घोट नोंदवली गेली. हे एकंदर चित्र पाहता राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तामानात लक्षणीय चढ-ऊतार पाहायला मिळू शकते.
हवमान विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली होती. 15 नोव्हेंबरला कमी दाबाच्या पट्ट्याची ही प्रणाली आणखी तीव्र होऊन आता पुढं हेच वारे उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेनं किनाऱ्याला लागूनच पुढे जाणार आहेत. त्यामुळं दक्षिण भारतामध्ये याचे परिणाम पावसाच्या तुरळक सरींच्या रुपात दिसू शकतात.
खासगी हवामान संस्था Skymet च्या अंदाजानुसार, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानाच लक्षणीय घट नोंदवली जाऊ शकते. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. गिलगिट, बाल्टिस्तान, लडाखमधील दुर्गम गावांमध्ये ही पारा चांगलाच खाली जाऊ शकतो. तिथं उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही परिस्थिती वेगळी नाही. थंडीचा वाढचा कडाका पाहता या राज्यांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं येणाऱ्या नागरिकांनीही हवमानाचा अंदाज घेऊनच पुढील बेत आखावेत असा इशारा देण्यात येत आहे.