विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update

Maharashtra Weather Update : पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोणत्या भागात कसं असेल हवामान? या आठवड्याभरात हवामानात नेमके काय बदल होणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त   

सायली पाटील | Updated: Dec 11, 2023, 07:01 AM IST
विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update  title=
Mahasrashtra Weather Update Today Weather Forecast Imd Alert latest news

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट होतं. पण, देशात सक्रिय असणारा पश्चिमी झंतावात आणि तत्सम वातावरणीय बदलांमुळं अवकाळीचं सावट आता कमी झालं असून, राज्यात हिवाळा त्याची पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होम्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील. 

फक्त विदर्भच नव्हे, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही थंडीचं प्रमाण वाढणार असून, किमान तापमानत 2 ते 3 अंशांची घट नोंदवली जाणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं रात्रीचं तापमान 18 ते 19 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असला तरीही सकाळ आणि दुपारच्या वेळी असणाऱ्या उकाड्यापासून मात्र शहरातील नागरिकांना अद्याप पाठ सोडवता येणार नाही हेसुद्धा तितकंच खरं. 

हेसुद्धा वाचा : Maharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड

 

थंडीचा कडाका वाढणार 

सध्या आग्नेय अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मालदीवपाशी समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचावर चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये ढगांची दाटी पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये पहाटेच्या वेळी तापमान मोठ्या फरकानं कमी झालेलं असेल. तर, कोकण भागामध्येही पहाटे आणि रात्री उशिरानं तापमानात घट होणार असली तरीही दिवसा तापमानात फारशी घट नोंदवली जाणार नाही. येत्या काळात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून राज्यातील गिरीस्थानांवर सुरेख हवामान पाहता येणार आहे. 

सध्या हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी झाल्यामुळं दमटपणा कमी झाला आहे. परिणामी हवेतील कोरडेपणा वाढून वाढत्या तापमानातही पहाटेच्या वेळी थंडीची जाणीव होत आहे. देशात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये कमालीची थंडी आणि बर्फवृष्टी सुरु आहे. पण, महाराष्ट्राकडे हे वारे खेचण्यासाठी पुरेसं दाबक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळं हे वारे पुढे येताना कमकुवत होत आहेत. ज्यामुळं राज्यात थंडीला इतका विलंब लागत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीचं हे बदललेलं समीकरण साधारण डिसेंबर अखेर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत असंच राहू शकतं. 

दरम्यान, तुम्ही जर देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये हिवाळ्याचा अनुभव घेण्यासाठी अर्थात हिवाळी सहलीसाठी जाणार असाल तर तिथं थंडीचा बंदोबस्त करूनच जा. कारण, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), काश्मीर (Kashmir), उत्तराखंडच्या (Uttarakhand) मैदानी क्षेत्रात थंडीचा कडाका वाढला असून, या राज्यांमध्ये पर्वतील भागांवर बर्फाची चादर पाहायला मिळत आहे.