आयुक्तांची 'गांधीगिरी', लेटलतिफांसाठी अनोखा धक्का

मालेगाव महापालिकेचे आयुक्तांनी (Malegaon Commissioner)  लेटलतिफ कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देत 'गांधीगिरी' ने स्वागत करून अनोखा धक्का दिला.  

Updated: Jan 30, 2021, 12:30 PM IST
आयुक्तांची 'गांधीगिरी', लेटलतिफांसाठी अनोखा धक्का  title=

नाशिक : मालेगाव महापालिकेचे आयुक्त (Malegaon Commissioner) त्र्यंबक कासार (Trimbak Kasar) यांनी महापालिकेच्या कार्यालयातील लेटलतिफ कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देत 'गांधीगिरी' ने स्वागत करून अनोखा धक्का दिला. आयुक्त कासार यांच्या या गांधींगिरीची महापालिका कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला. (Malegaon Commissioner cuts one day salary of late coming employees)

सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात लेट येण्याची परंपरा काही नवीन नाही. मात्र, महापालिका आयुक्त कासार हे दालनात दाखल झाल्यानंतर अनेक कर्मचारी कार्यालयात आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच खुर्ची टाकली आणि महापालिकेतील लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत केले. आयुक्त कासार एवढ्यावरच थांबले नाही तर लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देखील कपात केले. (cuts one day salary of late coming employees)