मंत्री रावते यांनी एका शेतकऱ्याला भरला दम

गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका शेतकऱ्याला चक्क दम भरलाय. 

Updated: Feb 17, 2018, 04:08 PM IST
मंत्री रावते यांनी एका शेतकऱ्याला भरला दम  title=

वाशिम : गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका शेतकऱ्याला चक्क दम भरलाय. 

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी गावाला रावते यांनी भेट दिली. तिथले शेतकरी रडून आपली व्यथा मंत्री महोदयांसमोर मांडू लागले. तसेच एका शेतकऱ्यानं शंभर टक्के शेतीचं नुकसान झालं असून  नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं रावते यांना सांगीतलं. त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते त्या शेतकऱ्यावर संतापले.

गारपीट होऊन चार दिवस झाले असून आम्ही नोटा घेऊन तुमच्या दारासमोर उभं राहायचं का ? असा सवाल रावते यांनी गारपिटग्रस्त शेतकऱ्याला केला. जास्त बोलू नका, असा दमही रावते यांनी त्या शेतकऱ्याला दिला. 
 
दरम्यान, टिंगल टवाळी करणाऱ्या शेतकऱ्याला आपण समजावल्याचा दावा रावतेंनी झी 24 तासशी फोनवरून बोलताना केला.