तोडफोड प्रकरणी अटकेतील मनसेचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू

 तोडफोड प्रकरणी अटक असलेले आरोपी कैलास गिरवले यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झालाय.  

Updated: Apr 17, 2018, 08:13 AM IST
तोडफोड प्रकरणी अटकेतील मनसेचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू title=

पुणे : अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी अटक असलेले आरोपी कैलास गिरवले यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झालाय. गिरवले पोलीस कोठडीत असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी रात्री ८.५० ला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

जगताप समर्थक कार्यकर्ते

गिरवले हे अहमदनगर महापलिकेत मनसेचे स्विकृत सभासद होते. तसेच ते आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक मानले जात. केडगावमधील शिवेसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी खुनानंतर नगर पोलिसांनी आमदार जगताप यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळेस गिरवले आणि त्यांच्या साथिदारांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर हल्ला करून आमदार जगताप यांना पळवून नेल्याचा आरोप आहे. 

याप्रकरणी गिरवलेसह इतरांना अटक करण्यात आली होती. दरम्यान पोलिस कोठडीत असताना गिरवले यांना पोलिसांकडून बेदम मारहान करण्यात आल्याचा आरोप कैलास यांचे बंधु बाबसाहेब गिरवले यांनी केलाय. त्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.