Uddhav Thackeray Rally in Malegaon : मालेगावात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले (Uddhav Thackeray Rally in Malegaon ). सत्तासंघर्षानंतर ठाकरे पहिल्यांदाच दादा भुसेंच्या मतदार संघात सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना शिंद फडणवीस सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. आपलं नाव, धनुष्यबाण चोरलेलं आहे. जिंकेपर्यंत लढायचं असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजप तसेच थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला.
मालेगावातल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी शिंदे-भाजपवर तुफान हल्लाबोल केला. तुम्ही खंडोजी खोपडेंची औलाद आहात, गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही..आयुष्यभर तुमच्यावरचा गद्दार शिक्का पुसला जाणार नाही. असा घणाघात त्यांनी शिंदेंवर केला. तर, भाजपवरही ठाकरेंनी हल्लाबोल केला. मिंधेंच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढणार का? तुमची 152 कुळं खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकत नाही असा घणाघात ठाकरेंनी केला.
माझ्या हातात काही नाही तरीदेखील एवढी गर्दी होतेय. ही सगळी पूर्वजांची पुण्याई आहे. मी पुन्हा मुख्यमंत्री होई पर्यंत लढायचे अशी शपथ अद्वय हिरे यांनी घेतली आहे. पण, मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय. मुख्यमंत्री हे पद येतं जातं, मात्र तुम्ही मला कुटुंबातील एक मला मानलं. हे भाग्य गद्दारांच्या माथी नाही. असं प्रेम गद्दारांना मिळत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दार, ढेकूणांसाठी तोफेची गरजच नसते असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
कोण म्हणतं कांद्याला भाव मिळत नाही. गेल्या वर्षी एक कांदा खरेदी झाला. किती खोक्याला कांदा खरेदी झाला. अडीच वर्षे आपले सरकार होते ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभं होते. कर्जमुक्तीची योजना राबवली होती. द्राक्ष बागायतदारांना फायदा मिळाला नाही. पण, उर्वरीत शेतकऱ्यांना मिळाली की नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची. पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देणार होतो पण गद्दारी झाली. मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरने शेतात जातात. सर्वसामान्य शेतकरी रात्री अपरात्री कधीही शेतात जातो. विजेचा पत्ता नाही, शेतीला भाव नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दोरी आणि घंटा बांधली. कृषिमंत्री महिलांना शिवीगाळ करतात. सुप्रीया सुळेंना शिवी दिली. तरीही सीएम कृषिमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. द्राक्ष नासली. अवकाळीचा फटका बसला. तरीही केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणतात, अवकाळीचा फटका विशेष काही नाही असं टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी केले.
निवडणुक आयोग अन्याय पद्धतीने वागले आहेत. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले नसतील तर मालेगावची सभा बघा. निवडणुक आयोगाचे गांडूळ झालं आहे. लाखोच्या संख्येने प्रतिज्ञ पत्र सदस्य पत्र सादर केली. मी शिवसेना असंच म्हणणार. माझ्या वडिलांनी निर्माण केलेली शिवसेना तुम्ही चोरली. स्वत:च्या बापाचे नाव घ्यायला लाज वाटते. कधीही निवडणुका जाहीर करा आम्ही तयार आहोत. तुमच्या कपाळावर गद्दार म्हणून शिक्का बसला आहे. हा शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही. जिथे जाल तिथे गद्दारीचा शिक्का तुमच्या मागे येणार.