Uddhav Thackeray In Malegoan: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावात (Malegoan Sabha) सभा घेतली. सत्तासंघर्षानंतर ठाकरे पहिल्यांदाच दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदार संघात सभा घेतली. या शिवगर्जना मेळाव्यातून ठाकरे सुहास कांदेंचा समाचार घेतला. एमएसजी महाविद्यालयाच्या (MSG College) मैदानावर ही सभा झाली. ठाकरेंच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमली, काही कार्यकर्ते हातात खोके घेऊन सभास्थळी दाखल झाले होते. सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray In Malegoan) यांनी कोरोना काळातील एक किस्सा सांगितला.
कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. आपण सर्वांनी आम्हाला साथ दिली. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो. पण मी ऑनलाईन मिटिंग करत सर्वांना समजवलं. त्यावेळी तुम्ही सर्वांनी नियमांचं पालन केलं. त्यावेळी तुम्ही साथ दिली नसती तर मालेगाव आज वाचलं नसतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शेतकऱ्यावर आस्मानी आणि सुलतानी संकट असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी सुहास कांदे (Suhas Kande) यांचं नाव न घेता टोलेबाजी केली आहे. एका कांद्याला खोक्यांचा भाव म्हणत त्यांनी टोलेबाजी केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील टोले लगावले आहेत.
जालन्यातील एक निष्ठावंत शिवसैनिक अनवाणी पायाने मालेगावातील उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी पायी गेले. उद्धव ठाकरे यांच्या श्रद्धेपोटी ते हातात मशाल आणि खांद्यावर भगवा घेऊन रस्त्याने मालेगावला चालत पोहोचले होते.
उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मुस्लीम बांधवांनी रोजे सोडत उद्धव ठाकरेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटच्या श्वासापर्यंत आपण उद्धव ठाकरेंना साथ देऊ अशा घोषणा मुस्लीम बांधवांनी (Muslim community) दिल्या.