Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा

Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 25, 2023, 08:43 AM IST
Monsoon Update : पुढील 4 ते  5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा title=
Maharashtra Monsoon Update । Monsoon will be active across Maharashtra in next 4 to 5 days

Maharashtra Monsoon Update : मान्सूनबाबत संपूर्ण राज्याला हवीहवीशी बातमी. महाराष्ट्राच्या वेशीवरच रेंगाळलेला मान्सून आता सक्रीय झाला आहे. गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता शनिवारी मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. पुढील 4 ते  5 दिवसांत महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. 

रायगड जिल्ह्यात उन्हामुळे करपत चाललेल्या भातरोपांना पावसाच्या सरींमुळे जीवदान मिळालंय. पावसानं जोर  धरल्यानं रखडलेल्या शेतीच्या कामांना पुन्हा वेग आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे. रात्रीपासून तळकोकणात रिमझिप पाऊस बरसत आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी मात्र सुखावला आहे. या पावसामुळे दुबार पेरणीचं संकटही टळले आहे. तळकोकणात आता लावणीपूर्व कामांची लगबग सुरु झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. 29 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपून काढले; पुढचे 48 तास महत्त्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलचे झोडपून काढले आहे. (Mumbai Rains) शनिवारी मुंबईत 115.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या 48 तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबईतल्या मान्सूनपूर्व तयारीचा यंत्रणांचा दावा मात्र फोल ठरला. किंग्स सर्कल, अंधेरी सबवेजवळ सखल भागात पाणी साचले. तर वाहतुकीलाही पाणी साचल्यानं मोठा फटका बसला. 

जुहू बीचवर थरार पाहायला मिळाला

मुंबईच्या जुहू बीचवर पोलिसांमुळे दोघांचे प्राण वाचले आहेत. जुहू बीच इथं बुडणाऱ्या दोघांना मुलांना मुंबई पोलिसांनी समुद्रातून बाहेर काढले आहे. याचा थरार पाहायला मिळाला आहे. 7 आणि 10 वर्षाची ही मुलं होती. सांताक्रूझ पोलीस स्टेशनचे हवालदार विष्णू बेळे यांनी तातडीने धाव घेत समुद्रात बुडणाऱ्या दोन मुलांना सुखरुपपणे बाहेर काढले. काही दिवसांआधी याच जुहू चौपाटीवर 5 मुले समुद्रात बुडाली होती.  मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.