Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या (Civil Services Main Exam) बाबतीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एमपीएससीने या परीक्षा देण्यासंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. एमपीएससीने या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. मुख्य परीक्षेतील तीन ते सात क्रमांकांचे पाचही पेपर हे एकाच भाषेत सोडणवे आवश्यक असणार आहे. त्यामुळे आता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एकतर मराठी (Marathi) किंवा इंग्रजी (English) या दोनच माध्यमांतून पेपर लिहीता येणार आहे.
तसेच लोकसेवा आयोगाने आठ आणि नवव्या क्रमांकाचा पेपर तसेच वैकल्पिक विषयांचे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे पेपर हे (Optional subjects) उमेदवाराने निवडलेल्या भाषेतच द्यावे लागणार आहेत. त्यामुळे जर उमेदवराने या विषयांचे पेपर लिहिताना मराठी भाषा निवडली असेल तर त्याला मराठीतच पेपर लिहावा लागेल. जर उमेदवाराने इंग्रजी भाषेचा पर्याय निवडला असेल तर त्याला इंग्रजीतून पेपर लिहावा लागणार आहे.
त्यामुळे उमेदवारांनी वैकल्पिक विषयांसाठी मराठी व इंग्रजी भाषेत पेपर लिहीण्याचे निश्चित केले असेल तर त्याला केवळ दोन्ही पैकी एकाच भाषेत पेपर लिहावा लागणार आहे. उमेदवाराने निवडलेल्या भाषेतूनच त्याला वैकल्पिक भाषेतील पेपर द्यावे लागणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक/पारंपरिक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरे लिखाण्याच्या माध्यमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://t.co/EINJrzNwmY pic.twitter.com/nUYrt8OxOo
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 26, 2022
पुढील वर्षी होणार मुलाखती
दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा, 2021 या पदाच्या मुलाखती या दिनांक 9 ते 17 जानेवारी, 2022 या कालावधीत मुंबई येथे आयोगाच्या मुख्य कार्यालय घेण्यात येणार आहे. मुलाखतीबाबत अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तर राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती या दिनांक 2 ते 6 जानेवारी, 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे होणार आहेत.