पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: नागपुरात सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या कापडाला लावलेली टाचणी चुकीनं गिळल्याच्या धक्कादायक (Shocking News) प्रकार घडला. यात श्वास नलिकेत अडकलेली टाचणी शस्त्रक्रिया (Surgery) न करता काढण्यात इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णालयाच्या ईएनटी (ENT Doctors) विभागाला यश आले. ब्रोंकोस्कोपी साह्यानं ही टाचणी काढून 24 तासात मुलीला सुखरूप उपचारानंतर (Treatment) सुट्टी देण्यात आली आहे. यात टाचणीचे ज्या पद्धतीनं अडकली होती ते काढणं अत्यंत जिकरीचे असतांना अवघ्या चार ते पाच मिनिटात टाचणी काढण्यात आली... यात लहान मुलं कशा पध्दतीनं घरातील मोठ्या मंडळीना (Children and their safety) अनुकरण करत दातात टाचणी धरली होती आणि अचानक गिळली. त्यामुळे पालकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केले. (nagpur news 5 cm pin stuck in boys neck removed without surgery)
सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलींन शनिवारी सकाळी शाळेत ओढणीला टाचलेली एक टाचणी तोंडात धरली होती. ती अचानक पणे दातातून सुटल्यान गिळल्या गेली होती. तीन शाळेतून घरी जात ही बाब आई वडिलांना सांगितली. त्यावेळी तिला पालकांनी तात्काळ इंदिरा गांधी मेडिकल रुग्णालय (Indira Gandhi Medical Hospital) तथा शासकीय महाविद्यालयात नेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्वरित एक्सरे करत टाचणी कश्या पद्धतीनं अडकली हे पाहून निश्चित केले.
हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
यावेळी यावेळी त्या टाचणीचा टोकदार भाग वरच्या दिशेने असल्याचे श्वास नलिकेत अडकली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हालचाल झाल्यास टाचणी श्वासनलिकेला (Respiratory System) फाडून इजा होईल अशी भीती होती. लागलीच निर्णय घेता ईएनटी विभाग प्रमुख जीवन वेदी यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या पाच मिनिटात ब्रोन्कोस्कोपी करून ती टाचणी बाहेर काढली.
हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
लहान मुलं बऱ्याचदा पालक जसे करतात त्यांचाच अनुकरण करून वागताना दिसतात. आई बहीण घरातील मोठ्या मंडळींनी कपड्यांना टाचण्यासाठी पिन किंवा टाचणीचा (Avoid Using Pin) वापर करतात. बरेचदा कापडाला लावण्यापूर्वी टाचणी किंवा पिन तोंडात पकडल्या जाते. त्यामुळ अशाच पद्धतीनं कधीतरी सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने पाहून ती पिन दातात पकडली असावी. पण ती हाताळताना ती अचानक गळ्यात जाऊन अडकली आणि जीवाला धोका निर्माण झाला. त्यामुळं पालकांनी लहान मुलांसमोर अनुकरण करतांना काळजी घेतली नाही तर किती धोकादायक ठरू शकतं हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.