नाशिक : नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या रुग्णालयातील टँकमधून ऑक्सिजनची गळती सुरु झाली आहे. ज्यामुळे आता पर्यंत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या अग्निशमन दलाकडून ही गळता थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना ICU बेड उप्लब्ध होत नाहीत. अशात आता ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून गळता सुरु झाली आहे. या रुग्णालयात तब्बल 150 रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 23 जण व्हेंटिलेटरवर होते. त्यातल्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा, त्यात आता हा निष्काळजीपणा. या सगळ्याला जबाबदार कोण?