'नवनीत राणांना महायुतीबाहेर काढा नाहीतर...', शिेदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा

Navneet Rana: राणा विरुद्ध शिवसेना हा वाद अमरावतीकरांसाठी नवा नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आलाय. राणा यांना शिवसेना शिंदे गटातून उघडपणे विरोध होऊ लागलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 8, 2024, 01:18 PM IST
'नवनीत राणांना महायुतीबाहेर काढा नाहीतर...', शिेदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा
शिेदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा

Navneet Rana: लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून महायुतीकडून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती. या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही होता. तसेच महायुतीत असलेल्या प्रहार संघटनेचा अमरावतीत बालेकिल्ला आहे. तिथे बच्चू कडु यांनी आपला उमेदवार उभा केला होता. निकालाअंतरी नवनीत राणा यांचा पराभव झाला आणि कॉंग्रेसच्या बळवंत वानखेडे यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव झाला. राणा विरुद्ध शिवसेना हा वाद अमरावतीकरांसाठी नवा नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आलाय. राणा यांना शिवसेना शिंदे गटातून उघडपणे विरोध होऊ लागलाय. 

'राणा यांना महायुतीबाहेर काढा'

राणा आणि अडसूळ यांच्या वादाचा दुसरा अंक आता सुरू झाला असून हा वाद आता पुन्हा टोकाला गेला आहे. त्यामुळे आता  राणा यांना महायुतीबाहेर काढा अन्यथा शिवसेना महायुतीतून बाहरे पडेल असा ईशारा शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. 

'छपरी नेत्यांना महायुतीत ठेवू नये'

'आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे स्वाभिमानी शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही स्वाभिमान सोडून राहू शकत नाही. आमच्या नेत्याबद्दल अस बोललं जातं असेल तर अशा या आमदाराला महायुतीबाहेर फेकल पाहिजे, नाहीतर आम्हाला महायुतीबाबत निर्णय घ्यावा लागेल.' त्यामुळे अशा छपरी नेत्यांना महायुतीत ठेऊ नये, असा इशारा सेना नेते अभिजित अडसूळ यांनी दिला आहे.

'आमच्यावर स्वाभीमानानं जगण्याचे बाळासाहेबांचे संस्कार'

रवी राणा हे नेहमी वाचाळपणे बोलतात. त्यांनीच आपल्या पत्नीचा घात करुन त्यांना पाडलं, असा दावा अडसुळांनी केला. जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचं चांगलं नाही. बनावट प्रमाणपत्र बनवून रवी राणांनी जनतेचा विश्वासघात केल्याची टीकाही त्यांनी केली. राणा यांचा इतिहास पाहिला तर जे सत्तेत असतात तेच यांचे देव असतात. बच्चू कडू हे रवी राणा यांच्यामुळेच महायुतीपासून दूर गेले. राणांना बाहेर काढा अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं की नाही ते सांगा, ब्लॅकमेंलिंग करणं आमच्या रक्तात नाही पण आमच्यावर स्वाभीमानानं जगण्याचे बाळासाहेबांचे संस्कार असल्याचे ते पुढे म्हणाले. 

बच्चू कडूंना परवानगी नाकारली 

आमदार बच्चू कडू यांचा छत्रपती संभाजी नगर येथील मोर्चा संदर्भात महत्वाची अपडेट समोर येतेय. बच्चू कडू यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र बच्चू कडू मोर्चा आणि सभा घेण्यावर थांब आहेत.  त्यामुळे कडू विरुद्ध पोलीस असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीत राहायचं की नाही हाही निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे बच्चू कडू काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'जाती आणि धर्माचे झेंडे घेऊन नाही तर आर्थिक विषमतेचा अजेंडा घेऊन आम्ही समोर जात आहोत. घरी बसून योजना देण्यापेक्षा कष्टकऱ्यांसाठी एक चांगली योजना द्यावी. पैसे नसतील तर राज्यपालाचा बंगला विकावा. यासाठी सरकारने पुढाकार घेतला नाही तर उद्याच्या सभेत वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिली आहे.