नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (NCP leader) एकनाथ खडसे यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. आता ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Eknath Khadse Corona positive) त्यांना आता १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खडसे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी (Corona test) केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे.
#BreakingNews एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह । गेल्या काही दिवस पासून खडसे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता । या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी केली होती । या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल प्राप्त#EknathKhadse @EknathGKhadse pic.twitter.com/3TyipVwyfM
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 31, 2020
या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल काल रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याच त्यात समोर आले आहे. या घटनेला खडसे परिवाराकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. तसे त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोरोनाच्या सदृश लक्षणे आढळून आल्याने खडसे यांनी ईडी चौकशीसाठी जाण टाळले होते. त्यांनी दिवसांची मुदत मागितली होती.