पुणे : एकमेकांकडे रागानं पाहण्याच्या कारणातून दोन भाडेकरूंमध्ये झालेल्या वादातून एका भाडेकरुनं दुसऱ्या भाडेकरुचा कोयत्यानं सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील खराबवाडी इथं घडलीय. विजय गायकवाड असं हत्या झालेल्या व्यक्तिचं नाव आहे.
चाकणजवळील खराबवाडी येथील भाडेकरु चाळीतील खोल्यांमध्ये विजय गायकवाड आणि मुकेश घोलप हे दोघे शेजारी रहायला होते. या दोघांमध्ये रविवारी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता.