अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मुंबई, नागपूरनंतर आता उत्सुकता आहे ती नाशिकची मेट्रो कशी असेल याची.... मुंबई, नागपूर, पुण्यापेक्षा नाशिकची मेट्रो एकदम हटके असणार आहे.
नाशिकची मेट्रो टायरवर धावणार आहे. खर्चामध्ये बचत करण्यासाठी ही नवी लाईट मेट्रो प्रत्यक्षात आली आहे. "न्यू मेट्रो" संकल्पनेवर आधारित पहिली मेट्रो नाशिकमध्ये धावणार आहे. ही मेट्रो टायरवर धावेल. तसंच ही एलिव्हेटेड आणि जमिनीवरून धावणारी असेल.
गंगापूर ते नाशिक रोड स्टेशन दरम्यान २२ किलोमीटर मार्गावर १९ स्थानकं असतील. तर मेट्रोचा दुसरा मार्ग गंगापूर ते मुंबई नाका दरम्यान १२ किलोमीटरच्या मार्गावर १० स्थानके असतील.
नाशिक मेट्रो साकारताना मुंबई, नागपूरच्या तुलनेत खर्चा निम्मा येणार आहे. लाईट मेट्रो संकल्पनेवर आधारित हे मॉडेल एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे.