अंबरनाथला प्रदूषित पाणी, कंपनीवर कारवाईची टाळाटाळ

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात  टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. 

Updated: Sep 30, 2018, 05:46 PM IST
अंबरनाथला प्रदूषित पाणी, कंपनीवर कारवाईची टाळाटाळ title=

अंबरनाथ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात  टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. 

मे महिन्यात पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अंबरनाथ येथे येऊन या धरणाची पहाणी केली होती. त्यावेळी या धरणाचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सदाभाऊ खोत यांनी लघु पाटबंधारे विभागाला  दिले होते. मात्र गेल्या चार महिन्यात या कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचा आरोप अंबरनाथ  मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.