स्वाती नाईक, झी मिडीया नवी मुंबई : नवी मुंबईच्या भव्य रेल्वे स्टेशन्सना सध्या पार्किंगच्या समस्य़ेने ग्रासलंय. सीवूड रेल्वे स्थानकावर भव्य असा मॉल उभा राहिला... मात्र इथे अजब प्रकार पाहायला मिळतोय. मॉलसाठी भव्य पार्किंग तर रेल्वे प्रवाशांसाठीचं पार्किंग अतिशय छोटं आहे. या पार्किंग मध्येच रिक्षा स्टॅन्ड देखील असल्याने गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. शिवाय पार्किंगमध्ये स्टेशन जवळील सोसायटीच्या गाड्या पाच दिवस पार्क केल्या जातात. यामुळे रोज रेल्वे ने ये- जा करणाऱ्या प्रवाश्यांच्या गाड्या पार्क करायला जागाच उरत नाही.
सिडकोने पार्किंग चे हे कंत्राट दिले असून, परप्रांतिय गुंडप्रवृत्तीचे लोक या कंत्राटदाराकडं काम करून अरेरवी करतात असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पैशासाठी हा कंत्राटदार खाजगी गाडयांना पार्किंग देत असल्याचे त्याच्या बोलण्यातून समोर आले.सिडको प्रशासनाने यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे,
सिडको तर्फे स्टिल पार्किंगचे काम सुरु असून, ही पार्किंग लवकर सुरु केल्यास तसेच, खाजगी गाड्या येथे उभ्या करू देण्यास अटकाव केल्यास पार्किंग चा प्रश्न सुटू शकेल.