डोंबिवलीत Ola Cab ड्रायव्हरसह घडले धक्कादायक कृत्य

डोंबिवलीत Ola Cab ड्रायव्हरला लुटण्यात आले आहे. आरोपी प्रवासी म्हणून कॅब मध्ये बसले होते. यानंतर चाकुचा धाक दाखवून ड्रायव्हरला लुटले. 

Updated: Jan 29, 2024, 09:26 PM IST
डोंबिवलीत Ola Cab ड्रायव्हरसह घडले धक्कादायक कृत्य title=

Dombivli Crime News : कल्याण ग्रामीण परिसरातील काटइ नाका येथे ओला चालकाला लुटण्यात आले आहे. या प्ररकरणी तीन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरामुळे डोंबिवली परिसरात ओला कॅबची सेवा देणाऱ्या चालकांमध्ये पसरली आहे. तसेच ड्रायव्हरलाच लुटले असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, 

शफिक खान ,अमन तौकिर अहमद अन्सारी ,आमन शौकत जमादार अशी या सराईत चोरट्यांचे नाव आहेत . यामधील अमन जमादार अमन अन्सारी या दोघांविरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत . त्यांनी याआधी अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत . त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले

नेमकं काय घडलं?

डोंबिवली जवळील ग्रामीण भागात काटई नाका येथून सचिन शाव हा ओला कारचालक आपली कार घेऊन जात होता. याच दरम्यान तीन जण प्रवासी बनून वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने कार मध्ये बसले. काही अंतरावर जाताच ओला चालकाला चाकूच्या धाक दाखवत त्याची कार, रोकड, आणि काही महत्त्वाची कागदपत्र घेऊन पसार झाले. 

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकाने तपास सुरू केला. तपासांती यातील चोरट्यांची ओळख पटवून मानपाडा पोलिसांनी त्यांना काटई नाक्यावरच सापळा रचत अटक केली. शफिक खान ,अमन अन्सारी आणि आमन जमादार असे या तिघांची नावे असून या तिघांनी याआधीही कोणाला लुटला आहे का याच्या तपास पोलीस करीत आहेत. सर्व आरोपी हे डोंबिवली पूर्वेतील खोणी परिसरात असलेल्या पलावा मध्ये राहणार आहेत. पोलिसांनी यांच्याकडून लुटण्यात आलेली कार, रोकड आणि इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत

व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी

एका ज्वेलरी व्यवसायिकाला  बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या पाच आरोपींना वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. यांच्याकडून एक करोड चाळीस लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना पालघर व राजस्थान ताब्यात घेण्यात आले. आरोपी बळुसीह परमार ह फिर्यादी याच्या कडे पाच वर्षापर्वी कामाला होता.  आपल्या साथिदारांना त्याने टीप दिली आणि चोरी केली. यातील दोन आरोपींना अगोदर अटक झाली होती.  बाकीचे आरोपी राजस्थान पळून गेले पोलिसांनी एक आठवडा यांच्यावर पाळत ठेवून त्यांना देखील पोलिसांनी अटक केली.