नाणार प्रकल्पाला विरोध : राजापूर बंदला चांगला प्रतिसाद

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरीविरोधात मच्छिमार, शेतकरी संघटनेने बंद हाक दिली होती या बंदला राजापूर तालुक्यातून प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Updated: Dec 28, 2017, 03:11 PM IST
नाणार प्रकल्पाला विरोध : राजापूर बंदला चांगला प्रतिसाद title=

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरीविरोधात मच्छिमार, शेतकरी संघटनेने बंद हाक दिली होती या बंदला राजापूर तालुक्यातून प्रतिसाद मिळताना दिसतोय.

संपूर्ण राजापूर तालुका आज बंद ठेवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या बंदला शिवसेना, स्वाभिमान पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असून संपूर्ण राजापूर तालुका पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

नाणार येथे येवू घातलेला पेट्रोकेमिकल प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत १४ गावातील ग्रामस्थांना नको असल्यामुळे या प्रकल्पाला तिव्र विरोध आहे हाच विरोध दर्शवण्यासाठी आज राजापूर बंदची हाक देण्यात आलेली होती त्या बंदला राजापूर तालुक्यातून चांगाल प्रतिसाद मिळत आहे.

राजापूर शहराची मुख्य बाजारपेठ, पाचल बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे तसेच राजापूरचे आमदार राजन साळवी देखील या बंदमध्ये सहभागी झाले असून ते देखील सकाळपासून ग्रामस्थांसोबत राजापूर तालुक्यातून फिरत आहेत.