Saif Ali Khan Health Update : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरी 15 जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूनं हल्ला केला. त्यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सैफ अली खानच्या हेल्थ अपडेटविषयी आणखी बरीच माहिती समोर आली आहे. याविषयी सांगण्यासाठी लिलावती रुग्णालयात मीडियाला बोलावण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तो रुग्णालयात कसा आला याविषयी देखील सांगितलं की तो कशा परिस्थितीमध्ये रुग्णालयात आला.
डॉक्टरांनी लिलावती रुग्णालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की 'सैफ अली खान जेव्हा रुग्णालयात आला होता. तेव्हा तो संपूर्ण रक्तबंबाळ होता. तरी देखील तो एका सिंहासारखा चालत आला. त्यानं स्ट्रेचर सुद्धा वापरलं नाही. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा छोटा मुलगा तैमूर होता. सैफ आता ठीक आहे. त्याला ICU मधून स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. आम्ही त्याला काही काळापूर्वी भेटलो. त्याला आम्ही चालवण्याचा प्रयत्न केला. तर तो व्यवस्थित चालू शकत होता. त्याला सध्या कोणताही त्रास होत नाही आहे. त्याशिवाय त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नाही आहेत. सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतरच त्याला आम्ही ICU मधून स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आहे.'
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की 'आम्ही त्याला काही काळ आराम करण्यास सांगितला आहे. जेणे करून लवकरात लवकर सगळ्या जखमा या भरून निघतील. त्यातही त्यानं त्याच्या पाठीची जखमी गंभीर असल्यानं, थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. कमीत कमी एका आठवड्यासाठी तो जास्त हालचाल करू शकत नाही. त्यामुळे त्याला जास्त लोकांना भेटू देण्यात येणार नाही. जेणे करून त्याची हालचाल जास्त होणार नाही आणि तो लवकरात लवकर बरा होईल. तो खूप लवकर बरा होतोय.'
हेही वाचा : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी क्राईम ब्रँचची टीम नोंदवणार अभिनेत्याचा जबाब
पुढे पॅरालेलीस होऊ शकतो का असं विचारता डॉक्टर म्हणाले की 'असं काही अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे देवाची कृपा आहे. त्याशिवाय सैफवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. जर तो ठीक झाला तर आम्ही त्याला 2-3 दिवसात डिस्चार्ज देऊ. तर ठीक होण्यासाठी त्याला 1 आठवडा लागू शकतो.'