Deaf-Mute Couple Runs Pani Puri Stall : पाणीपुरी (panipuri), गोलगप्पे (Golgappe) आणि पुचकी (Puchki)...चौपाटीवर जाऊन पाणीपुरी खाण्याची मजाच काही और असते. पाणीपुरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पुरी आणि त्यासोबत खट्टा मिठ्ठा आणि तिखट पाणी जिभेचे चोचले पुरवतात. अनेक वेळा पाणीपुरी खाऊन पोट भरतं पण मन नाही. आम्हाला सांगा तुम्ही कुठल्या कुठल्या पाणीपुरीचा आनंद घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर एका पाणीपुरी स्टॉल सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. तुम्ही कधी या स्टॉलची पाणीपुरी खाल्ली आहात का? या स्टॉलची एक खास वैशिष्ट आहे...
सोशल मीडियावर (social media ) व्हायरल (Viral) होत असेलल्या या व्हिडीओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, पाणीपुरी स्टॉल चालवणारी महिला हातवारे करुन ग्राहकांना मसाल्यांबद्दल विचारत आहेत. असं तर हे स्टॉल चालणारे हे नवरा-बायकोला न बोलता येतं ना ऐका येतं...हे जोडपे ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी हातवारे करताना दिसत आहेत. आपापसात संवाद साधण्यासाठी स्टॉलवर अनेक गोष्टी लिहिल्या आहेत आणि हाताचे हावभाव...
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये (Nashik) पाणीपुरीचा एक छोटासा स्टॉल हे जोडप चालवतं. नाशिकच्या आडगाव नाका (Adgaon Naka) येथील जत्रा हॉटेलजवळ (Near Jatra Hotel) हा स्टॉल लावण्यात आला आहे. सध्या या जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पाणीपुरी विकणाऱ्या या जोडप्याचा व्हिडीओ इंटरनेटवर अनेकांचे मनं जिंकत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म इन्स्टाग्राम फूड व्लॉगर या अकाऊंटवर 'स्ट्रीट फूड रेसिपी' नावाने शेअर करण्यात आला आहे. या स्टॉलचे एक अजून वैशिष्ट्य म्हणजे हे जोडपे पाणीपुरीचं साहित्य सगळं घरी बनवतात.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हे तुम्हाला भावूक बनवेल आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. नाशिकमध्ये एक मूकबधिर जोडपे पाणीपुरीचा स्टॉल चालवतात. ते जे काही देतात ते त्यांनी घरी बनवलेले असते, अगदी पुरीसुद्धा. जेवण देताना ते स्वच्छतेची काळजी घेतात. हे जोडपे खूप प्रभावी आहे, जे आपल्या पिढीने अनुसरण केले पाहिजे आणि त्यांच्याकडून शिकले पाहिजे.
व्हिडिओला हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आणि आतापर्यंत 3.7 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'प्रत्येकाने येथे यावं आणि त्यांचं मनोबल वाढवावे! खरोखर प्रेरणादायी. दुसऱ्याने लिहिले की, 'ही रील पाहिल्यानंतर धन्य वाटत आहे.' तिसर्या यूजरने लिहिले की, 'त्याच्याकडे काहीतरी खास होते ज्याची अनेक जोडप्यांकडे सर्व काही असूनही त्यांची कमतरता असते. देव त्यांना आशीर्वाद देवो.'