Today Petrol Diesel Price on 15 february 2024 : तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. यामध्ये पारदर्शकता धोरणानुसार किंमत ठरवली जाते. त्याची अंमलबजावणी 2014 मध्ये झाली. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्यात तेल कंपन्या पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. सरकार कर आणि इतर धोरणात्मक उपायांद्वारे किंमतींवर प्रभाव टाकू शकतात. पेट्रोल आणि डिझेलमधील फरक अनेक घटकांनी प्रभावित होतो. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाची किंमत, डॉलर-रुपया विनिमय दर, मागणी आणि पुरवठा इत्यादींचा समावेश करुनच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात.
दरम्यान तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना प्रति लिटर डिझेल 3 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यांचा पेट्रोलवरील नफा कमी झाला आहे. पेट्रोलवरील नफा आणि डिझेलवरील तोटा कमी झाल्यामुळे कंपन्या किरकोळ दरात कपात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही (15 फेब्रवारी 2024) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात फक्त 1 डॉलरने घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत जवळपास $1 घसरून $81.60 प्रति बॅरल झाली. डब्ल्यूटीआय तेलाचा दर देखील प्रति बॅरल $76.43 पर्यंत घसरला.
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचित बदल झाला असून आज (15 फेब्रुवारी) मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे. तर पुण्यात पेट्रोल दर प्रतिलिटर 106.17 रुपये तर डिझेलचा दर 92.68 रुपये प्रतिलिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. तर नाशिकमध्ये डिझेलचा भाव 93.05 रुपये प्रतिलिटर आहे. त्याचबरोबर नागपुरात पेट्रोलचा दर 106.11 रुपये तर डिझेलचा दर 92.66 रुपये प्रतिलिटर आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.75 रुपये दराने विकले गेले. डिझेल 95.45 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.
पेट्रोलियमच्या किमतीतील बदलांबाबत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी 'इंडिया एनर्जी वीक' दरम्यान सांगितले होते की, सरकार दर ठरवत नाही. तेल कंपन्या सर्व आर्थिक पैलूंचा विचार करून निर्णय घेतात. बाजारात अजूनही अस्थिरता आहे याची तेल कंपन्यांना जाणीव आहे, असेही पुरी म्हणाले. दरम्यान तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस कच्च्या तेलाचे दर घसरले असतील. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या तिमाहीत त्यात पुन्हा वाढ झाली. तोटा सहन करण्यासाठी डिझेल तेल कंपन्यांना प्रति लिटर 3 रुपये खर्च करावा लागतो. शिवाय, पेट्रोलवरील नफ्याचे मार्जिन प्रति लिटर 3-4 रुपयांनी कमी झाले आहे. तसेच देशातील 90 टक्के इंधन बाजार इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम किंवा तीन सरकारी कंपन्यांच्या नियंत्रणाखाली आहे.