Petrol Diesel Price on 20 Feb 2024 : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करणार हे गेल्या दीड वर्षापासून सर्वसामान्य जनता ऐकत आहे. कारण या दीड वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक रुपया सुद्धा कमी केलेला नाही. दरवाढ करुन हा निर्णय जणू लॉक करण्यात आला आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारात आज (20 फेब्रुवारी 2024) पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. अलीकडेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा 83 डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. पण, राज्याच्या काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल करण्यात आला आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोदी सरकारच्या आधी काँग्रेसच्या काळात इंधन किंमती वाढ झाल्यावर तत्कालीन विरोधी पक्ष आणि आताच्या सत्ताधाऱ्यांनी देश डोक्यावर होता. मात्र भाजप सत्तेत आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याऐवजी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. त्यानंतर जनतेने मोठा रोष व्यक्त केल्यानंतर गेल्या वर्षीपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. एकदाच हे भाव उंच्चाकावर पोहचल्यानंतर आता लोकसभा निवडणूक येत असल्याने पेट्रोलवर 10 रुपयांच्या सवलतीचा दावा केला जात आहे.
आज (20 फेब्रुवारी) मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे. तर पुण्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.22 रुपये तर डिझेलचा दर 92.73 रुपये प्रतिलिटर आहे. नाशिकमध्ये आज पेट्रोल महाग झाले असून पेट्रोल 106.76 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.26 रुपये प्रतिलिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.59 रुपये प्रतिलिटर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.90 रुपये दराने विकले जाते. डिझेल 95.59 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. तर ठाण्यात आज पेट्रोल महाग झाले असून पेट्रोल 106.45 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे.
तुम्ही आता घरबसल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर चेक करु शकता. इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी RSP <डीलर कोड> तपासा आणि 9224992249 वर एसएमएस पाठवा. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस पाठवा. BPCL ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 किंवा या नंबरवर संदेश पाठवा. काही मिनिटांनंतर तुम्हाला SMS द्वारे नवीनतम किंमती प्राप्त होतील.