थेरगाव क्विननंतर पिंपरीत आणखी एक इन्स्टाग्राम भाई, पोलिसांनी दाखवला हिसका

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धमक्या देण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत  

Updated: Apr 29, 2022, 09:27 PM IST
थेरगाव क्विननंतर पिंपरीत आणखी एक इन्स्टाग्राम भाई, पोलिसांनी दाखवला हिसका title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : हातात तलवार, कोयता अशी शस्त्र घेऊन धमकी देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. अश्लिल शिवीगाळ करणं, धमक्या देणं यासाठी तर सोशल मीडियावर सर्रास वापर केला जातो. 

अश्लील, शिवीगाळ आणि धमकी देणारे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये तीन महिन्यांपूर्वी दोन 18 वर्षीय मुलींना अटक करण्यात आली होती. ही तरुणी पिंपरी चिंचवड भागात लेडी डॉन म्हणून वावरत होती.

इन्स्टाग्रामवर भाईगिरी करणारा अटकेत
आता असाच एक प्रकार पिंपरी-चिंचवडच्या शस्त्र विरोधी पथकाने पुढे आणला आहे. पिंपरीत रहाणाऱ्या तेजय वायदंडे या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या तेजसने हाताय कोयता घेत धमकी देत असल्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. 

रणजीत चव्हाण आणि अजय नावाचे दोन गुंड तडीपार आहेत. त्यांना तेजसने खुलं आव्हान देणारा व्हिडिओ शेअर केला होता. एका हातात कोयता घेऊन छातीत कोयत्यानं वार करण्याची भाषा तेजसनं या व्हिडीओमध्ये वापरली होती. 

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या शस्त्र विरोधी पथकानं तात्काळ कारवाई करत तेजस वायदंडेच्या मुसक्या आवळून त्याला पोलिसी हिसका दाखवला.