पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविरोधात जनजागृतीचं काम करणा-यांना मारहाण करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमधले प्रशांत इन्द्रेकर आणि त्यांचे साथीदार कौमार्य चाचणीविरोधात सोशल मीडियावरुन जनजागृती करायचे. त्यांच्याच समाजातल्या एका लग्नाला ते गेले असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केली.
समाजाच्या रूढी परंपरांना विरोध का करता, असा सवाल करत मारहाण करण्यात आली. प्रशांत इंद्रेकर यांनी या विरोधात पिंपरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय. प्रशांत आणि त्याचे साथीदार stop the v ritual नावाचा व्हाट्स अप ग्रुप चालवत होते.