Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन 6 मार्च 2023 रोजी म्हणजेच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइनपद्धतीने होत आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. बहुप्रतीक्षेत पुणे मेट्रोचे लोकार्पण होत असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मेट्रोच्या पहिल्या दोन टप्प्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुण्यात उपस्थित राहून केले होते. त्यामुळं मेट्रो अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या पुण्यातील नेत्यांना तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटनदेखील त्यांच्याच हस्ते पुण्यात प्रत्यक्ष हजर राहून व्हावे, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. परंतु, आता आता रुबी हॉल मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक या तिसर्या टप्प्यातील मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
मेट्रोच्या तिसर्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 6 मार्च 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली आहे.
रूबी हॉल ते रामवाडी या मार्गावर अद्याप मेट्रो सेवा सुरू झालेली नाहीये. साडेपाच किलोमीटरच्या या मार्गावर बंडगार्डन, कल्याणी नगर आणि रामवाडी अशी तीन स्थानके आहेत. ऑक्टोबर 2023मध्ये या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. मेट्रोमुळं येरवडा, रामवाडी आणि विमानतळ (लोहगाव) प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रूबी हॉल ते रामवाडी या तिसऱ्या टप्प्यात एकूण चार स्थानके आहेत. बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके असून सध्या तीन स्थानकातून मेट्रो कार्यरत होणार आहे. येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्याने पालिकेने तो दुसरीकडे हलवण्यास सांगितला होता. त्यानुसार महामेट्रोकडून काम सुरू आहे. म्हणूच सध्या येरवडा हे स्थानक वगळण्यात आले असून येत्या महिनाभरात स्थानक सुरू केले जाणार आहे.
येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडीपर्यंत प्रवाशांना पोहोचणे सुलभ होणार आहे. महामेट्रोच्या गर्दीच्या वेळी दर साडेसात मिनिटांनी नागरिकांसाठी मेट्रो सेवा उपलब्ध असतील. तर, उर्वरित वेळेत दर 10 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे.
रूबी वाडी ते रामवाडी हा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर पुणेकरांना मेट्रो प्रवासादरम्यान बंड गार्डन बंधाऱ्यावर नदीचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.