Maharashtra Political News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार आहेत. राज ठाकरे लवकरच शिवसेना भवनासमोर सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Raj Thackeray Sabha ) नवीन वर्षातील पहिली सभा पुढील दहा दिवसात होण्याची शक्यता आहे. मात्र मनसेची (MNS) तोफ शिवसेनाभवनासमोर धडकणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News Maharashtra)
राज ठाकरे कोकणात दोन आणि मुंबईत एक सभा घेणार आहेत. त्यातली एक सभा शिवसेनाभवनासमोर होण्याची शक्यता आहे. मात्र इथे सभा घेण्याची परवानगी मिळाली नाही तर आणखी दोन पर्याय ठेवण्यात आलेत. मात्र हे पर्यायही सेना भवनाच्या जवळच आहेत. दादरचं शिवाजी पार्क, सेनाभवनासमोर रस्ता आणि मिनाताई ठाकरे पुतळ्यासमोर सभा घेण्याचे पर्याय राज ठाकरे यांच्यासमोर आहेत.
राज ठाकरे यांची आज जाहीर मुलाखत आहे. (Raj Thackeray Interview) पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक मराठी परिषदेत राज यांची ही मुलाखत होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर ही मुलाखत घेणार आहेत. सध्या पेटलेल्या धर्मवीरसह इतर वादांवर राज ठाकरे या मुलाखतीत काय बोलणार याची उत्सुकता आहे. आगामी महापालिका निवडणुकांआधी राज ठाकरे सध्या चांगलेच सक्रीय झालेले दिसत आहेत.
राज सातत्याने पुणे दौरा करत आहेत. पुण्यावर राज यांनी स्वतः लक्ष केंद्रीत केलंय. तसंच राज यांनी नागपूर आणि कोकण दौराही केला. पक्षबांधणीसाठी राज स्वतः मैदानात उतरले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज यांनी वेळोवेळी महाविकास आघाडीला लक्ष केलंय. त्यामुळे आजही राज ठाकरे यांची तोफ कोणावर धडाडणार याची उत्सुकता लागली आहे.