मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीकेचे तीव्र बाण सोडले आहेत.
'जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही असं राज्य सरकार म्हणत आहे. ते कोरोनाच्या बाबतीत लागू पडत असल्याची टीका, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लॉकडाऊन लावण्यात येतो का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. परिस्थिती अत्यंत बिकट होत असताना, राज्यात लॉकडाऊनची शक्यता व्यक्त करण्यात येत असताना, 'राज्यावर लॉकडाऊन लादला तर भाजप तो खपवून घेणार नाही असा इशाराही प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.
लस, कोविड केंद्र ते साहित्यापर्यंत सगळं काही केंद्र सरकारनं पुरवलंय. तरीही राज्य सरकारच सगळं नियोजन कोलमडलेलं आहे. राज्य सरकारचं सामान्यांकडे लक्ष नाही, त्यांना सत्ता प्रिय आहे. त्यामुळे माझी केंद्राला विनंती आहे की, त्यांनीच यामध्ये लक्ष घालावं. - @mipravindarekar pic.twitter.com/iDIdTpUqnl
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 1, 2021