पुणे : शहरात जाहिरात फलकाचे अजस्त्र लोखंडी खांब कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार झालेत. तर चार जण जखमी झालेत. मंगळवार पेठेमध्ये जुना बाजार चौकात ही दुर्घटना घडलीये. दरम्यान, शिवाजी परदेशी यांचा मृत्यू हा चटका लावणारा होता. पत्नीच्या अस्थी आळंदीत विसर्जित करुन येत असताना पतीवर घाला घातला गेला. शिवाजी हे शिक्षा चालक होते. ते रिक्षाने येत असताना होर्डींगचा खांब त्यांच्या रिक्षावर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. कालच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या अस्थी विसर्जित करुन येत असताना त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला.
भल्यामोठ्या होर्डिंगखाली अनेक रिक्षाही दबल्या गेल्या आहेत. मृतांमध्ये श्यामराव कासार, राम धोत्रे आणि शिवाजी परदेशी यांचा समावेश आहेत. शिवाजी परदेशी हे पत्नीचं अस्थिविसर्जन करून परतत असताना त्यांचा या अपघातात मृत्यू झालाय. त्यांच्यासोबत असलेली त्यांची मुलं सुदैवानं बचावली. या जाहिरातीचा फलक रेल्वेच्या जागेत उभारण्यात आलेला होता. या फलकामुळे अपघात झाल्यानं पुण्यातील रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.