Pune Bypoll Election Result 2023 : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll Election) महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांच्या विजयात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची शिवसेना यांचा मोठा हातभार आहे. शिवाय दुचाकीनेही हातभार लावल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या दुचाकीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कोणाला मदत हवी असेल किंवा कोणी कधीही हाक दिली की धंगेकर हे आपल्या स्कूटरला किक देऊन तात्काळ हजर व्हायचे. हिच त्यांची मदत निवडणुकीतील विजयासाठी कामी आली.
रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांना पराभवाची धूळ चारली. त्यांच्या विजयाची राज्यात चर्चा आहे. आता त्यांच्या दुचाकीची चर्चा होऊ लागली आहे. धंगेकर हे नेहमी अनेकांना अॅक्टिवावर प्रवास करताना दिसतात, त्यांचे घर ते महापालिका कार्यालय हा रोजचा प्रवास ही अॅक्टिवावरुन असतो. अनेकांच्या भेटीगाठी घेतात मतदारांशी संपर्क ठेवला. त्यांच्या विजयानंतर अनेकांनी त्यांच्या दुचाकीसोबत फोटो काढून घेतले.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाची 'ही' प्रमुख कारणे
कसबा पेठ मतदारसंघात भाजपला पराभूत करणे तसे शक्य नव्हते. मात्र, महाविकास आघाडीमधील तीन्ही पक्षांची एकजूट हे त्यामागील प्रमुख कारण आहे. रवींद्र धंगेकर यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढली होती. यावेळी त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालिन उमेदवार गिरीश बापट यांना मोठे आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. बापट यांनी नवख्या धंगेकरांवर केवळ 7 हजार मतांनी विजय मिळवला. ही सल त्यांच्या मनात कायम होती. त्यांनी लोकांच्या कामे करण्यावर भर दिला होता. पराभवाने खचून न जाता त्यांनी जोमाने काम करणे सुरुच ठेवले होते. त्यासाठी त्यांनी आपल्या दुचाकीचा त्यासाठी उपयोग केला. त्यामुळे त्यांची सामन्यांचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख झाली. हीच ओळख त्यांच्या विजयाच्या रुपांनी मिळाली.
Ravindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे कोण आहेत रवींद्र धंगेकर?
कसबा पेठेतून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.