पुणे : पुणे किडनी रॅकेटप्रकरणी आणखी 3 रुग्णालयं रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. वानवडीतील इनामदार रुग्णालयापर्यंत धागेदोरे पोहोचले आहेत. ठाण्यातील ज्युपिटरसह कोयंबतूरचं हॉस्पिटल सहभागी? असल्याची शक्यता आहे. रुबी हॉल क्लिनिकनंतर आणखी 3 रुग्णालयांची नावं पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी रॅकेटचा प्रकार उघडकीस आला होता. महिलेला 15 लाखांचं आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण नंतर महिलेला पैसे दिले नाहीत. यानंतर तिने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात रुग्णालयाच्या 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आता आणखी काही जणांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.