पुणे : पुणे मेट्रोचे कोच पुण्यामध्ये पोहचल्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्टेशनवर या कोचची विधिवत पूजा करत स्वागत करण्यात आलं. मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. या वेळी मेट्रोच्या तीनही कोचला फुलांनी सजवण्यात आलं होतं. नवीन वर्षात पुणेकरांना मेट्रोची भेट मिळणार आहे. पुणे मेट्रोचा कोच नेमका आहे कसा याची उत्सुकता पुणेकरांमध्ये आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेले मेट्रोचे डबे सोमवारी रूळावर आणण्यात आले. पिंपरीतील या मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. यावेळी ही नवी मेट्रो पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. या नव्या मेट्रोची नागरिकांमध्य़े प्रचंड उत्सुकता दिसत होती. लोकं मोबाईलमध्ये या नव्या मेट्रोचे फोटो टिपण्यासाठी गर्दी करत होते.
सावधान सावधान..! बघा आणि सर्वांना कळवा.. #AaliApliMetro
पुण्याची पहिली मेट्रो रुळावर!! #पुणेमेट्रो चे डबे लवकरच चाचणी साठी सज्ज होत आहे.
सर्व नागरिकांच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार. pic.twitter.com/4oJmbtnXKN— Pune Metro Rail Project (@metrorailpune) December 30, 2019
याआधी जेव्हा मेट्रोचे हे डबे पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले तेव्हा त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.
#AaliApliMetro
पुणे व पीसीएमसीकरांचे स्वप्न पूर्णत्वाकडे#पुणेमेट्रो चे शहरात आगमन. फ्रेंड्स ऑफ मेट्रो द्वारे मेट्रो डब्ब्यांचे ढोल, ताशांसोबत जोरदार स्वागत.Dream coming true moment for all of us#PuneMetro coaches are welcomed in city by our Friends Of Metro with beats of dhol pic.twitter.com/1ZvQPpXkly
— Pune Metro Rail Project (@metrorailpune) December 29, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ डिसेंबरला पुणे मट्रोच्या कोचचे अनावरण केले होते.
पुणेकर आतुरतेने प्रतीक्षा करित असलेल्या #पुणेमेट्रो कोचचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात अनावरण. नगरविकासमंत्री व गृहमंत्री @mieknathshinde उपस्थित. पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू असून या मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार pic.twitter.com/CxAwh7Nv5h
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 27, 2019
मेट्रोचा हा डबा 40 टन वजनाचा असून 20 मीटर लांब आहे. इतर मेट्रोचे डबे देखील लवकरच रुळावर येणार आहेत. त्यामुळे २०२० या नवीन वर्षात पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.