Pune News: पुणेकरांनो पोलिसांना सूचना द्यायच्यात? आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा 'हा' Whatsapp नंबर

Pune Police News: तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झालेत. आता थेट तक्रार करण्यासाठी व्हॉट्सऍप सेवा (Whatsapp Number) पुणे पोलिसांनी सुरू केलीये.

Updated: Jul 10, 2023, 09:06 PM IST
Pune News: पुणेकरांनो पोलिसांना सूचना द्यायच्यात? आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा 'हा' Whatsapp नंबर title=
Pune Police Share Whatsapp Number

Pune Police Share Whatsapp Number:  सदाशिव पेठेत पेरुगेट चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला (koyta Gang) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याआधी एमपीएससी करणाऱ्या तरुणीची हत्या झाल्याचं दिसून आलं होतं. त्याचबरोबर पुण्यात कोयता गँगची दहशत वाढत चालल्याचं दिसतंय. त्यामुळे आता पुणेकर किती सुरक्षित आहेत, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. पुणे पोलिस (Pune Police) नेमकी कोणती कारवाई करत आहेत? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता पुणे पोलिसांकडून वेगवेगळे उपाय राबवण्यास सुरूवात केली आहे.

तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झालेत. आता थेट तक्रार करण्यासाठी व्हॉट्सऍप सेवा (Whatsapp Number) पुणे पोलिसांनी सुरू केलीये. 8975953100 या व्हॉट्सऍप क्रमांकावर, पुणे शहरातील नागरिक थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करू शकतात. तसंच तातडीच्या सेवेसाठी 112 क्रमांकावर डायल करण्याचं आवाहन करण्यात आलंय. 

आणखी वाचा -  Pune Crime News: तिची 'जात' कोणती? सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत!

पुणे पोलीस आता अॅक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. पोलिसांनी दामिनी पथकांची संख्या देखील वाढवली आहे होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. सेवेत जारी करण्यात आलेल्या या नंबरवर महिलांसंदर्भात सुरक्षेबाबत सूचना किंवा अभिप्राय मागवला आहे. या नंबरवर ज्या तक्रारी येतील त्यावर आता तातडीने कारवाई होणार असल्याचं आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलं आहे.

पाहा ट्विट - 

दरम्यान, अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये आयुक्तांनी ही माहिती दिली. पुणे महिला पोलिसांची 25 दामिनी पथके नव्याने निर्माण होणार असल्याने आता पथकांची संख्या 40 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता गुन्हेगारीला खरंच आळा बसणार का? असा सवाल विचारला जातोय.