पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर आणि रात्रीही पावसाचा जोरा कमी होता. मात्र घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे. परिणामी पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्याने, चारही धरणात पाणीसाठा वाढत आहे. खडकवासला धरण अद्यापही 100 टक्के भरलेले असल्याने धरणातून धरणातून 1712 तर कालव्यातून 1005 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या पावसाळ्यात आता पर्यंत मुठा नदीत खडकवासला धरणातून ३.१९ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
खडकवासला -२ मिमी, पानशेत -२३ मिमी, वरसगाव- २० मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३५ मिमी पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १८.२५ ( ६२.६२ टक्के) टीएमसी झाला आहे.
गेल्या २४ तासातील हा पाऊस आहे.मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ९.७३(३३.३९ टक्के) होता
पुण्याला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण यापूर्वीच शंभर टक्के भरले होते. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण परिसरातही पाऊस चांगला झाला आहे. या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
धरणांतील पाणीसाठा
धरण उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) टक्के
खडकवासला १.९४ ९८.४०
पानशेत ६.४० ६०.०७
वरसगाव ७.१५ ५५.७८
टेमघर १.६८ ४५.२२
पवना ५.०६ ५९.४१
कळमोडी १.५१ १००धरणसाठा आणि पाऊस अपडेट
१८ जुलै २०२२ ( सकाळी ६ वाजता)